पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २१ : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली असून याप्रकरणी अभिजीत कुलकर्णी ( वय २१, रा. कुल्फीवाली चाळ, यशवंतनगर, येरवडा, पुणे ) यांनी तीन इसम व एका महिलेविरूध्द तक्रार दाखल केली आहे.
पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत सोबत आणलेल्या कोयता आणि फायटरने डोक्यात वार करून जखमी केले आहे.आरोपी महिलेने फिर्यादी यांना शिवीगाळ करत याला मारा, याला खूप मस्ती आहे असे म्हणत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. आरोपींनी त्यांच्या हातातील कोयता हवेत फिरवत येथे फक्त आमचीच दहशत चालणार, कोणी दुसरा येथे आला तर त्याला जिवंत सोडणार नाही, आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली आहे.
आरोपींवर भादवि कलम ३२४.३२३, ५०४, ५०६, ३४ महा. पो. का. क. ३७ (१)१३५. आर्म ॲक्ट ४ (२५), क्रिमीनल लॉ अमेन्डमेंट ॲक्ट क ३ व ७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपींना ताब्यात घेण्यात आले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शेलार हे करत आहेत.












