पुणे प्रतिनिधी
पुणे दि .३० : वानवडी येथील सेंट पॅट्रिक टाऊन, सोसायटी मध्ये (ता.२७) रात्रीच्या सुमारास जुन्या वादाचा राग मानत धरून दहशत पसारावणाऱ्या तीन आरोपीन विरोधात एका ३१ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी निहिर चंद्रकांत पटेल (वय ३२ रा. गंगा गगन सोसायटी, घोरपडी), किशन पंडित दळवी (वय २८ रा. सदर), ब्रायन एस अलेक्झांडर (वय २६ रा. सदर) असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्याशी मागील महिन्यात आरोपी निहीर पटेल यांच्याशी झालेल्या वादाचा राग मनात धरून इतर साथीदारांसह फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने घुसून मारहाण करून दुखापत केली.तसेच फिर्यादी यांच्यासोबत पिजी तत्त्वावर राहणाऱ्या मुलांना “कोई बाहर नही आयेगा, कोई शोर नही करे गा, कोई किसी को फोन नही करेगा” अशी धमकी दिली. व फिर्यादीचे तोंड दाबून “ओरडला तर जीवे मारून टाकेन” अशी धमकी देऊन शेजारील लोकांना धमकोन फिर्यादी यांच्यासोबत राहणाऱ्या इसमाचा मोबाईल फोन फेकून नुकसान केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शितोळे करीत आहेत.












