पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १२ : जुन्या वादाच्या रागातून टोळक्याने तरुणास मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी मनोज सूर्यवंशी ( वय २० वर्षे रा. धायरी, पुणे ) या तरुणाने चार इसमां विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी आणि फिर्यादी यांचे मित्र यांचे आरोपीं सोबत भांडण झाले होते.त्या भांडणाचा राग मनात धरून दि. ११ रोजी सिध्दार्थ कॉम्पलेक्स, बी विंग समोरील रॉयल चहा टपरी येथे फिर्यादी हे चहा पित होते.त्यावेळी आरोपी हे तेथे आले आणि तु भाई झालास काय, तुला खुप मस्ती आली आहे. आज तुझी मस्ती जिरवतो असे बोलून कमरेला लपवून ठेवलेल्या धारदार हत्याराने फिर्यादी यांच्या डोक्यावर, पाठीवर, कमरेवर वार केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले आहे.
आरोपीवर भादवी कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४.महा.पो.अधि.क. १९५१. ३ (१) सह १३५ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला ताब्यात घेण्यात आले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करत आहेत.












