पिंपरी(प्रतिनिधी) : ताथवडे येथील जेएसपीएम संचालित राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे स्वायत्ततेच्या पहिल्या बॅचचा पासिंग आऊट समारंभ 2 ऑगस्ट 2023 रोजी ग.दि. माडगूळकर सांस्कृतिक सभागृह, आकुर्डी, पुणे येथे दुपारी ३ वाजता आयोजित केला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे उपसंचालक प्रा.ए.एस. देवस्थळी यांनी दिली. फोर्ब्स मार्शल, या नामांकित इंडस्ट्रीचे सह-अध्यक्ष नौशाद फोर्ब्स हे या पासिंग आऊट सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ. आर के जैन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
प्रत्येक शाखेतील प्रथम दोन क्रमांकधारकांना अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक देऊन गौरविण्यात येईल. तसेच या कार्यक्रमादरम्यान, महाविद्यालयातील प्रत्येक उत्तीर्ण विद्यार्थ्याचा शैक्षणिक आणि इतर अतिरिक्त उपक्रमांमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल विशेष कौतुक प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येईल, असे महाविद्यालयाचे परीक्षा नियंत्रक डॉ. बी.डी. जाधव यांनी सांगितले. जेएसपीएमचे संस्थापक सचिव, डॉ. टी. जे. सावंत आणि इतर व्यवस्थापन प्रतिनिधींनी सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
जेएसपीएम राजर्षी शाहूच्या वतीने पहिल्या स्वायत्तता बॅचचा पदवी प्रदान समारंभ












