मुंबई | प्रतिनिधी
जे.जे.रुग्णालयातील अतिदक्षता विभागात रविवारी १५ वर्षाच्या मुलीसोबत साफसफाई कर्मचाऱ्याने विनयभंग केला होता. सदर प्रकरणाबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कडक कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते.
आज बुधवार रोजी जे. जे. रुग्णालयातील पीडित १५ वर्षीय मुलीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून तिला आवश्यक असणाऱ्या शालेय वस्तू, पुस्तके तसेच रोजच्या वापरातील साहित्य भेट म्हणून देऊन तिला मानसिक आधार देण्यात आला. तसेच आगामी काळातही तीला योग्य ती मदत करण्याचे आश्वासन डॉ. गोऱ्हे यांनी पीडित मुलीच्या पालकांना दिले.












