पुणे प्रतिनिधी
पुणे 7 : शुक्रवारी रात्री झेड ब्रिजजवळ एक मोठा अपघात झाला, नारायण पेठेतील झेड ब्रिज कॉर्नरजवळ एका मद्यधुंद चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. या अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर 3 ते 4 जण किरकोळ जखमी झाले आहेत.
रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद ड्रायव्हर आणि त्याचा मित्र शहरात कार चालवत होते. ते अलका चौकाजवळ आले असता उमेश हनुमंत वाघमारे (48) या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि झेड पुलाजवळील विजेच्या खांबाला धडकण्यापूर्वी त्याने पादचारी, दुचाकी आणि ऑटोरिक्षाला धडक दिली.
घटनेत नारायण पेठ येथील विश्वनाथ रामचंद्र राज्योध्याय (६०) असे एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे. वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कारने धडक दिल्याने पादचारी खाली कोसळला होता आि मदतीसाठी रुग्णवाहिका बोलविण्यात आली होती मात्र डॉक्टरांनी त्याला जागीच मृत घोषित केले.












