पुणे प्रतिनिधी
पुणे दि.२ : विश्रांतीवाडी चौकात दहशत माजविणाऱ्या टोळी प्रमुखासह पाच साथीदारांवर मकोका कारवाई करण्यात आली आहे.(टोळी प्रमुख) विक्रांत ऊर्फ सरडा प्रकाश देवकुळे (वय २०रा. बोपखेल),कुणाल ऊर्फ साहिल बाबू पेरुमलट (वय २१.रा येरवडा), रोहित शैलेश सदाकळे वय २१ रा. सदर),गणेश बाबू बावधाने (वय २० रा.औंध), आदित्य भारती शेगडे वय २० रा पिंपळे गुरव), तेजस ऊर्फ बलमा अर्जुन गायकवाड (वय २० रा.जुनी सांगावी) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ४१ वी आहे.
पोलिसांच्या तपासा मध्ये टोळी प्रमुख नव्याने टोळी तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे. मागील चार वर्षां पासून आरोपीवर व त्याच्या साथीदारांवर शस्र जवळ बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत,नागरिकांच्या मालमतेचे नुकसान करणे, अशा गुन्ह्यात सहभागी आहे.
सदर आरोपीने दि.१७ जुलै रोजी झोमॅटो कंपनीचे डिलेव्हरी बॉय हे ऑर्डर घेऊन विश्रंतीवाडी चौकातून जात असताना टोळी प्रमुख व त्याचे साथीदारांनी फिर्यादी यांची दुचाकी अडवली. हातातील धारदार हत्याराचा धाक दाखवून फिर्यादी यांच्या बॅगेतील पंधराशे रुपये रोख रक्कम काढून घेतली. सदर भागातील दुचाकी व तीनचाकी वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केली आहे.
आरोपी विरोधात भा.द.वी.कलाम ३९५,३९७,३९२,३४१,४२७ आर्म ऍक्ट कलम ४(२५),मपो.अधि.कलाम ३७(१)(३),१३५ अंतर्गत विश्रांती वाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सह पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील करीत आहेत.
सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परि-४ शशिकांत बोराटे, सह पोलीस आयुक्त आरती बनसोडे, यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, सर्व्हेलन्स पथकाकडील पोलीस अमलदार मनोज शिंदे, सुनील हसबे यांनी केले आहे.












