पुणे, दि. ११ : ट्रान्सफॉर्मर मधील तेल सांडवत तांब्याच्या तारा चोरून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.ही घटना लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून मोहन वरघट यांनी एका अज्ञात इसमा विरूध्द तक्रार दाखल केली आहे.
दि. ०९ रोजी आरोपी यांनी टकले वस्ती, गट नं. २७/१ हिंगणगाव ता. हवेली जि. पुणे येथे ट्रान्सफॉर्मर मधील तेल सांडवत दहा हजार रुपयांचे नुकसान केले आहे.तसेच ऐंशी किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या आहेत.
आरोपीवर भादवि कलम ४२७ सह भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार साळुंखे हे करत आहेत.












