पुणे प्रतिनिधी
पुणे दि.३१ : वडारवाडी परिसरात अवघ्या चार वर्षाच्या मुलाचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना (दि.३०) रोजी दुपारी चारच्या सुमारास गोखलेनगर रोडवर घडली आहे. सार्थक मल्लिनाथ बिराजदार (वय ४) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. या प्रकरणी मुलाचे वडील मल्लिनाथ बिराजदार यांनी चतु:शृंगी पोलिसात फिर्याद दिली आहे.
सदर मुलगा आईस्क्रीम आणण्यासाठी रस्त्यावरून धावत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने चिमुकल्याला जबर धडक दिली. या धडकेत मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे. आरोपी विरोधात भा.द.वि कलम ३०४ (अ), २७९ मोटार वाहन कायदा १८४ अंतर्गत चतु:शृंगी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












