पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २६ : सोशल मीडियाचा ओळखीतून एका डॉक्टरने महाविद्यालयात शिकत असणाऱ्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की डॉ. शुभंकर महापुरे (वय 26, रा. तळजाई पठार, धनकवडी) असे गुन्हेगाराचे नाव असून त्याच्या विरोधात एका वीस वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी पुण्यात शिक्षणासाठी आलेली आहे. तिची आणि डॉक्टरांची सोशल मीडियावर ओळख झाली.
ओळखीतून पुढे बोलणे वाढले व त्यानंतर त्याने तिच्याशी भेटण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने 24 सप्टेंबर रोजी रात्री तरुणीला जेवण करण्यासाठी कार्यालयात बोलावून घेतले. जेवण करण्यापूर्वी त्यांने तिला मद्य पाजले. त्यामुळे तिला गुंगी आली व त्यानंतर त्यांने तरुणीवर लैंगिक अत्याचार केले असल्याचे समोर येत आहे.












