पुणे : फॅमिली फिजिशियन आणि आय. एम. ए.चे माजी राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी आरोग्याच्या मूलभूत प्रश्नांवर आधारित लिहिलेल्या ‘स्वास्थ्य संवाद’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवारी (दि. 6) आयोजित करण्यात आला आहे.
आडकर फौंडेशन आणि संस्कृती प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे होणार आहे. पुस्तकाचे प्रकाशन नॅशलन इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅलमॉलॉजीचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांच्या हस्ते होणार आहे. नामवंत बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि संस्कृती प्रकाशनच्या संचालिका सुनिताराजे पवार यांनी निवेदनाद्वारे दिली.












