पुणे । प्रतिनिधी
पुणे दि.१९ : इन्स्टिट्यूट ऑफ़ इंजिनिअर्स इंडियाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आकुर्डी येथील डी. वाय.पाटील शैक्षणिक संकुलाचे विभाग प्रमुख(ॲडमिशन इंचार्ज) डॉ. के. टी. जाधव ‘अकॅडमी एक्सलन्स (हेड ऑफ द डिपार्टमेंट)’ यांना ॲकॅडमीक एक्सलन्स ॲवार्ड देवून सन्मानित करण्यात आले.
डॉ. के. टी . जाधव हे गेल्या १६ वर्षापासून आकुर्डी येथील डी.वाय पाटील शैक्षणिक संकुलामध्ये ॲडमिशन इंचार्ज म्हणून कार्यरत आहे. संशोधन कार्य व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी विशेष योगदान दिले असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ‘अकॅडमीक एक्सलन्स’ ॲवार्डने ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स’चे अध्यक्ष डॉ. कृष्णराव गोडबोले यांच्या हस्ते त्यांना ‘हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज डी. पाटील,विश्वस्त आ. ऋतुराज पाटील, तेजस पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक, डॉ. ए. के.गुप्ता,आकुर्डीचे शैक्षणिक संकुल संचालक रेअर ॲडमिरल(नि) अमित विक्रम यांनी डॉ. जाधव यांचे अभिनंदन केले आहे.












