पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१६ : स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2023 हा विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या काही महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा देशव्यापी उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये केंद्र आणि राज्य मंत्रालये, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे समस्या विधाने (प्रॉब्लेम स्टेटमेंट) सादर केली जातात. अशा प्रकारचे उपक्रम विद्यर्थ्यांना उत्पादनातील नावीन्यपूर्ण संस्कृती आणि समस्या सोडवण्याची मानसिकता विकसित करतात . स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2023 ही स्पर्धा विविध वयोगटांमध्ये स्टार्टअप आणि इनोव्हेशन इकोसिस्टमची संस्कृती रुजवण्यासाठी आणि नवीन पद्धतीचा समावेश करून पुढील पिढीची उत्क्रांती घडविण्यासाठी मदत करते. ही स्पर्धा नियमित विद्यार्थ्यांना (ग्रॅज्युएट,पोस्ट-ग्रॅज्युएट, पीएच.डी) त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यास व आउट-ऑफ-द-बॉक्स ओपन इनोव्हेशन कल्पना निर्माण करण्यास संधी उपलबध करून देते.
आकुर्डी येथील नामांकित डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन’ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर असे दोन विभाग करण्यात आले होते ज्यात 80 हुन अधिक संघानी आपला सहभाग नोंदविला ज्यात 492 विदयार्थ्यांनी आपली संकल्पना तज्ञांसमोर सादर केली.
विषयतज्ञ म्हणून आय थीम कॉन्सुलटिंग चे संचालक डॉ पंकज चव्हाण, इनो व्हेशन डिव्हिजनचे प्रोग्रॅम मॅनेजर श्री विशाल पिल्लई, उद्योजकता स्टार्ट-अप आणि इनोव्हेशन फोरमचे संचालक प्रो संजय जगताप, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड चे प्रोग्रॅम मॅनेजर सत्यनारायण मूत्तिनेनी, तसेच नीलसॉफ्ट चे उपाध्यक्ष श्री निलेश परदेशी, संस्थापक, सुमगो इन्फोटेक श्री सुधीर गोर्डे, सिक्युरिटी विश्लेषक श्री प्रवीण शिनगारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इन्स्टिटयूट ऑफ आर्टीफिसिअल इंटेलिजन्स,एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सहयोगी संचालक डॉ आनंद जे कुलकर्णी, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ अनुपमा पाटील, उपप्राचार्य डॉ सुनील डंभारे, कुलसचिव श्री वाय के पाटील, कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ नलिनी जगताप, डॉ वंदना पाटील तसेच सर्व विभागप्रमुख शिक्षक उपथित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो तेजश्री गुळवे यांनी केले तर डॉ वंदना पाटील यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली.
या कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी डॉ प्रिया चार्ल्स, डॉ सुवर्णा पाटील,डॉ नलिनी जगताप आणि डॉ वंदना पाटील यांचे सहकार्य लाभले. डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ अनुपमा पाटील, उपप्राचार्य डॉ सुनील डंभारे, कुलसचिव श्री वाय के पाटील तसेच सर्व विभागप्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रिअर ऍडमिरल अमित विक्रम, डी. वाय. प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री. तेजस एस. पाटील , संस्थेचे चेअरमन श्री. सतेज डी. पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.












