पुणे : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘स्मार्ट टेक करिअर्स‘ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी (दि. 19) आयोजित करण्यात आला आहे. डॉ. शिकारपूर यांचे हे 51वे पुस्तक आहे.
नितीन प्रकाशन प्रकाशित या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सायंकाळी 5:30 वाजता विद्यार्थी साहाय्यक समितीचे अच्युतराव आपटे सभागृह, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, हॉटेल ललित महल समोर येथे आयोजित करण्यात आला आहे. पुस्तकाचे प्रकाशन मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कोहिनूर ग्रुपचे संस्थापक–अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, बेलराईज इंडस्ट्रीज् च्या कार्यकारी संचालिका सुप्रिया बडवे, विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे












