मुंबई : आरोग्य, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण व सामाजिक क्षेत्रात मोलाचे कार्य केल्याबद्दल, शिक्षणमहर्षी ,समाजरत्न स्व. आबासाहेब बंडगर सर (घाटकोपर) यांची सुकन्या डॉ. स्मिता रणजित काळे बंडगर यांना महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण २०२४ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
डॉ स्मिता काळे यांचे शिक्षण:
डॉ स्मिता रणजित काळे बंडगर
MD,MBBS ,DMRE, LLB,AFIH, Certifying Surgeon
– संचालिका – नवजागृत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
– अध्यक्ष – मेडीग्लोब हेल्थ केअर First Aid
– सेक्रेटरी – सिध्दनाथ एज्युकेशन ॲकेडमी, अंतर्गत ३ शाळा,घाटकोपर पश्चिम व विक्रोळी.
– Ex- Lecturere डी .वाय .पाटील आणि राजावाडी रुग्णालय
– Ex- Honarary डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रसूती महानगर पालिका रुग्णालय
– संचालक – Kale’s occupational health centre
– Certifying Surgeon for पुणे, नाशिक आणि पालघर , DGFASLI आणि शिपिंग , महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत आहेत…
– संचालक – २ हॉस्पिटल व ३ डायग्नोस्टीक सेंटर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विशेष उपस्थितीत मुंबई मध्ये संपन्न झाला.
महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा , “डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार” सामजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे साहेब यांच्या हस्ते मला प्रदान करुन सन्मानित करण्यात आले त्याबद्दल त्यांचे आभार!