पुणे प्रतिनिधी
पुणे दि.२४ : तंबाकू विक्री करणाऱ्या व्यापारावर गोळीबार करून फरार असलेल्या तिघा आरोपींना युनिट शाखा -२ कडून अटक करण्यात आले आहे. त्यांच्या कडून २ अग्नीशस्र, ३१ जिवंत काडतुसे व रोख रक्कम जप्त करण्यात आले आहे. स्वारगेट पोलीस स्थानकात आरोपींन विरोधात गुन्हा दाखल आहे.
सदर आरोपी हे गुन्हा करून फरार झाले होते. आरोपींचा तपास सुरु असताना बंगळूर येथे चामर पेठ परिसरात असल्याची माहिती युनिट -२ चे पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांना बातमीदारांमार्फत मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी बंगळूरला पथक पाठवले असता. अभय कुमार सुभेद कुमार सिंग (वय २३ रा.मार्केट यार्ड, मूळचा बिहार), नितीश कुमार रमाकांत सिंग (वय २२ रा.सदर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सखोल चौकशी दरम्यान गुन्ह्यात वापरलेली हत्यारे व रोख रक्कम पुण्यातील आंबेडकर नगर,मार्केट यार्ड येथे राहत्या घरी ठेवले असल्याचे सांगितले. तसेच गुन्ह्यातील साथीदार मोहम्मद बिलाल तसुद हुसेन शेख (वय २९ रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या कडून तीन लाख ५२ हजार पाचशे रुपये किंमतीची रोकड जप्त करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करीत आहेत.
सदर कामगिरी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह.आयुक्त संदीप कर्णिक
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,अपर पोलीस,पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे,पोलीस सहा.आयुक्त सुनील तांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली सह.पोलीस निरीक्षक वैशाली भोसले,पोलीस उप निरीक्षक नितीन कांबळे, राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार संजय जाधव,उजव्वाल मोकाशी,शंकर नेवसे, नामदेव रेणुसे, मोहसीन शेख,उत्तम तारू, राहुल राजपुरे, विनोद चव्हाण, साधना ताम्हाणे,विजय पवार, गणेश थोरात,अमोल सरडे,प्रमोद कोकणे, गजानन सोनुने,निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख यांनी केले आहे.
तंबाकू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना केले जेरबंद












