पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१२ : येरवडा पोलीस ठाण्याच्या रोकॉर्ड वरील तडीपार असलेल्या आरोपीला पिस्टलासह ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई (दि.१०) चंदननगर पोलिसांनी केली आहे. रोहित राजू धाडवे (वय २२ रा. संघर्ष चौक चंदननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
सदर आरोपी हा चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिव्हर डेल सोसायटी नदी पात्रा मध्ये सिमेंट रोडवर जवळ पिस्टल बाळगुन परिसरात फिरत असल्याची बातमी पोलीस अंमलदार श्रीकांत कोद्रे व सुरज जाधव यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी घटना स्थळी धाव घेते आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत कंबरेला मागच्या बाजूने पॅन्टीच्या आत खोचून ठेवलेले एक अग्ननीशस्त्र सापडले.
तसेच आरोपीला पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षा करिता ताडीपार करण्यात आले होते. परंतु आरोपीने आदेशाचा भंग केल्याने आरोपी विरोधात आर्म अक्ट कलम ३/२५ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३), १३५ व १४२ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. येरवडा पोलिसात ३०७ आर्म अक्ट कलम ४(२५) तर चंदननगर पोलिसात ३८४ इतर कलमान्वेय गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा पोलीस उपायुक्त परिमंडळ – ४ शशिकांत बोराटे, सह पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सह पोलीस निरीक्षक प्रशांत माने, अंमलदार गणेश हांडगर, शिवाजी धांडे, श्रीकांत शेंडे, सचिन रणदिवे, अविनाश सपकाळ, सुभाष आव्हाड, महेश नाणेकर, सुहास निगडे, सुरज जाधव, शेखर शिंदे यांनी केले आहे.












