पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०५ : आरोपीला तडीपार केले असताना देखील त्याने विनापरवाना हत्यार बाळगल्या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही घटना चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
प्रदीप गोरखनाथ गोडांबे या खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्याने सुनील मारुती लोणी ( वय २२, रा.नलावडे वस्ती, रेल्वे विहार शेजारी, बिजलीनगर, चिंचवड ) याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
आरोपी याला पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. असे असताना देखील तो विनापरवाना एक लोखंडी कोयता बाळगताना मिळून आला आहे.
आरोपीवर भादवि कलम आर्म ॲक्ट ४ ( २५ ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२,३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार जगताप हे करत आहेत.












