पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड दि.२८ : हिंजवडी परिसरत तडीपार असलेल्या आरोपीला मोंजिनीस बेकरी,थेरगाव येथून अटक करण्यात आली आहे. आकाश रंगनाथ चव्हाण (वय २६ रा. काळाखडक, वाकड) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी गुंडगिरी विरोधी पथकातील पोलीस शिपाई रामभाऊ मोहिते यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
सदर आरोपीला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया कडून १ वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. सदर आरोपीला २५ जुलै ते ८ ऑगस्ट पर्यंत परिसरात फिरण्यास सक्त मनाई केले होते. तरी देखील आरोपी परिसरात आढळून आला आहे. त्याच्या कडून लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे.
आरोपी विरोधात भा.द.वि कलाम भारतीय हत्यार कायदा कलाम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस ॲक्ट कलाम ३७ (१)(३) सह १३५, १४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सह पोलीस निरीक्षक ठाकूर करीत आहे.












