पिंपरी (प्रतिनिधी): श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ निगडी-प्राधिकरण, आणि आकुर्डी-निगडी-प्राधिकरण या दोन्ही संघाच्या वतीने अर्हम विज्जा प्रणेता उपाध्याय प्रवर प. पु. प्रवीणऋषीजी मा. सा यांच्या पावन सान्निध्यात शहरात प्रथमच “वर्षीतप धारणा महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वर्षीतप धारणा समिती प्रमुख राजेंद्रजी मुनोत यांनी दिली.
दि. १ ते ३ एप्रिल २४ या दरम्यान निगडी प्राधिकरण येथील पाटीदार भवन येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
दि १ एप्रिल रोजी स ७ वा संतोष चंगेडिया यांच्या संभाजी चौकातील निवासस्थान ते गणेश तलावा जवळील पाटीदार भवन या दरम्यान रॅली काढून मंगल प्रवेश होईल. यानंतर नवकारशी, प्रवचन, गौतमप्रसादी, वर्षीतप धारणा मंत्र, चौविहार, आनंद चालीसा असे धार्मिक कार्यक्रम होतील.
दिनांक २ एप्रिल रोजी अर्हम पुरुषाकार शिबीर, नवकारशी, जीनवाणी प्रवचन, गौतम प्रसादी इत्यादी कार्यक्रम होतील. दुपारी महिलांसाठी विशेष मार्गदर्शन शिबीर, संध्याकाळी उद्योजकांसाठी “व्यवसायात जैन तत्वांचा उपयोग” या विषयावर गुरुदेव ऋषी प्रवीण हे मार्गदर्शन करतील तसेच मनिष गुप्ता हे यशस्वी व्यावसायिकता चे चार स्तंभ यावर सेमिनार घेणार आहेत.
दिनांक ३ एप्रिल रोजी अर्हम पुरुषाकार शिबीर, नवकारशी , प्रवचन, ४५ वर्षावरील पुरुषांसाठी विशेष मार्गदर्शन शिबीर होईल. दि ३१ मार्च ते ३ एप्रिल या दरम्यान ७२ तास अष्टमंगल निवासी शिबीर होणार आहे.