गेट वेळेत का उघडले नाही या कारणावरून एकाने सुरक्षारक्षकाला महाराणा करत त्याच्याकडील रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना १० मार्च २०२४ रोजी सोमाटणे येथे घडली.
याप्रकरणी पोलिसांनी योगराज विश्वनाथ मुर्हे याला अटक केली आहे. तर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात या प्रकरणी भगवान सिंग श्रीराम सेवक यादव (वय ३६ रा. सोमाटणे) यांनी (दि. २४ मे रोजी) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मेव्हणा हे गेटवर थांबले असताना वेळेत गेट का उघडले नाही म्हणत आरोपीने त्यांना शिवीगाळ करत हाताने व लोखंडी रॉड ने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या खिशातील बाराशे रुपये व मोबाईल काढून घेत त्यांना जमिनीवर ढकलून जखमी केले. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास परत मारहाण करण्याची धमकी दिली. यावरून तळेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली, असून पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या अधयक्षते खाली तळेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.