पुणे शहरातील पाट्या आणि बॅनर प्रसिद्ध आहेत. पुणेरी पाट्यांची चर्चा होते असते तसेच बॅनरची चर्चा होते. पुणे शहरात अनेक जणांसाठी भावी आमदार, भावी खासदार, भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले गेले आहेत. आता त्यात शिवसेना नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या नावाची भर पडली आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
लोकसभेनंतर काही महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचे अनेक दावेदार असणार आहेत. परंतु विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणखी एका व्यक्तीचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांनी पुढे आणले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले आहे. यामुळे राजकीय चर्चांना जोर आला आहे.
पुणे शहरातील पाट्या आणि बॅनर प्रसिद्ध आहेत. पुणेरी पाट्यांची चर्चा होते असते तसेच बॅनरची चर्चा होते. पुणे शहरात अनेक जणांसाठी भावी आमदार, भावी खासदार, भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले गेले आहेत. आता त्यात शिवसेना नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या नावाची भर पडली आहे. तानाजी सावंत यांना संघर्ष सेनेचे संतोष साठे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना तानाजी सावंत यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री केला आहे. त्यांनी पुणे शहरात लावलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. पुण्यातील कात्रज चौकात हे बॅनर लावण्यात आले आहे.