पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २८ : जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ही घटना येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली असून अस्लम उर्फ बिल्ला इस्माईल शेख ( वय २० वर्षे, रा. चिंतामणी नगर, हडपसर, पुणे ), बिलाल इस्माईल शेख ( वय २१ वर्षे, रा. सैय्यदनगर हडपसर, पुणे ) अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरुन रामवाडी येथे जात असताना रोडच्या कडेला थांबले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकी वरून आलेल्या आरोपींनी फिर्यादी यांच्या पॅन्टचे खिशातील एकूण पंचवीस हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले आहेत.
तपासादरम्यान आरोपींना पकडून पोलिस स्टेशनला आणण्यात आले.त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केली असता त्यांनी या चोरी बरोबरच अन्य ठिकाणी चोरी केल्याचेही कबूल केले आहे. त्यांच्याकडून एकूण ऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपींवर भादवी कलम ३९२, ३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ- ४, श्री शशिकांत बोराटे मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे श्री संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पो स्टे पुणे श्री बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक, गुन्हे श्रीमती कांचन जाधव, पोलीस निरीक्षक, गुन्हे, श्री. जयदिप गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार, गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, प्रविण खाटमोडे, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले यांनी केली आहे.












