पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०४ : बांधकाम साइटवर काम करीत असताना अकराव्या मजल्यावरून पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. ३) दुपारी थेरगाव येथे घडली.राम नरेश यादव (वय ४१, रा. वाकड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम यादव हे मंगळवारी थेरगाव येथील सिव्हर क्रिस्टल या इमारतीच्या अकराव्या मजल्यावर काम करीत होते. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांचा तोल गेल्याने ते खाली डक्टमध्ये पडले.
जखमी झालेल्या यादव यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
असे अनेक अपघात वारंवार पिंपरी चिंचवड शहरात घडत आहे विकासात आणि कंन्टॅक्टदार यांच्याकडून मजुरांच्या सुरक्षतेची खबरदारी घेतली जात नाही का? आणि घेतली जात नसेल तर या सगळ्यांना जबाबदार त्या विकासकाला का धरलं जात नाही असा संतप्त प्रश्न सर्व सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.












