
पुणे : दत्तवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीतील अट्टल गुन्हेगारा विरोधात स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. समीर राहुल हतांगळे (वय २२ वर्ष, रा. दांडेकर पूल) हा त्याच्या साथीदारांसह दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी रॉड, धारदार हत्यार, या सारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर हत्यार बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील आहे. मागील पाच वर्षामध्ये त्याच्या विरोधात तीन गुन्हे दाखल आहेत.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, यांनी नमूद आरोपी विरोधात एम. पी. डी.ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे एक वर्षासाठी स्थानबध्दतेचे आदेश दिले आहेत. ही स्थानबध्दतेची कारवाई श्री. जयराम पायगुडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दत्तवाडी पोलीस स्टेशन पुणे व श्रीमती वैशाली चांदगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी. सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची एम.पी.डी.ए.कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही २८ वी कारवाई आहे.












