पुणे प्रतिनिधी
पुणे दि.२७ : वाहन लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन संशयितांना कोथरूड पोलिसांनी गजाआड केले होते. या प्रकरणाचा तपास केला असता, त्यांचा काही दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचे समोर आले. लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्यांच्याकडे काही संवेदनशील माहिती असल्याचे निष्पन्न झाले होते. यातील एक संशयित पळून गेला होता, मात्र आता त्याला पकडण्यासाठी त्याची प्रतिमा प्रसारित करण्यात आली आहे. एटीएस (दहशतवाद विरोधी पथक) या तिसऱ्या संशयिताचा शोध घेत आहे.
शाहनवाज आलम असे तिसऱ्या संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. शाहनवाजने मोहम्मद इम्रान मुहम्मद युसूफ खान उर्फ अमीर अब्दुल हमीद खान (२३) आणि मुहम्मद युनूस मुहम्मद याकुब साकी (२४, दोघेही रा. मिठानगर, कोंढवा, मूळ रा. हरमला कुलकुंडी, रतलाम, मध्य प्रदेश) या दोन संशयित दहशतवाद्यांना रसद पुरवली व त्यांना राहायला आश्रय देखील देखील दिला होता.
अटक करण्यात आलेले दोन दहशतवादी 5 ऑगस्ट 2023 पर्यंत पोलिस कोठडीत असताना, त्यांच्या घराची तपासणी केल्यानंतर काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि एक पांढरी पावडर जप्त करण्यात आली. फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे, परंतु प्राथमिक तपासात श्वान पथकाने पांढर्या पावडरमध्ये काही स्फोटके असल्याचे पुष्टी केली आहे.
दहशतवादी संबंध प्रकरणातील तिसऱ्या संशयिताची ओळख पटली : एटीएसचा पुढील तपास सुरु












