
पुणे : प्रतिबंधात्मक कारवाई करूनही ओंकार शंकर कुडले (रा. कोथरुड) या आरोपीने पुन्हा पुन्हा गुन्हे केले आहेत. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ओंकार व त्याचे साथीदार एका कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन जातीवाचक शिवीगाळ करून साऊंड सिस्टीम चालविणाऱ्या इसमावर वार केला. तो वार साऊंड सिस्टमच्या मिक्सर वर पडला व मिक्सर फुटून बंद पडला. या प्रकरणी टोळी प्रमुख व टोळी विरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी ओंकार ऊर्फ आबा शंकर कुडले (वय २८ वर्षे, रा.कोथरूड) अशोक ऊर्फ आशुतोष बाबासाहेब काजळकर (वय २५ वर्षे, कोथरूड) अक्षय ऊर्फ वारक्या सुनिल पवार (वय २७ वर्षे रा. भुगाव) व्यंकटेश हरीदास अंकुशे (वय २७ वर्षे रा.रामनगर) मयुर शंकर येनपुरे (वय २५ वर्षे रा.भुगाव) आकाश दिपक लोयरे (वय २३ वर्षे, रा. भुगाव) ओंकार रघुनाथ साळवी, (वय २४ वर्षे, रा. कोथरूड) गणेश दत्तात्रय शिंदे (वय २८ वर्षे, रा.कोथरूड) यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
दाखल गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२), ३ (४) प्रमाणे कलम वाढविण्यासाठी सदर मान्यता मिळणे बाबतचा प्रस्ताव मा सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, श्री भिमराव टेळे यांनी मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०३, पुणे शहर, श्री. सुहेल शर्मा यांचे मार्फतीने मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री प्रविणकुमार पाटील यांना सादर केला आहे.
सदर प्रकरणी छाननी कोथरुड़ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. १८८/२०२३ भादंवि कलम १२०(ब),३०७,४२७, ५०४,३४. सह शस्त्र अधिनियम ४.२५ सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट कलम ३ व ७ सह अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३ (१) (४), ३ (१)(s). ३ (२) (va) या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii).३).३ (४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील यांनी पूर्व मान्यता दिलेली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग श्री भिमराव टेले हे करीत आहेत. तर कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०३ श्री सुहेल शर्मा, मा. सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे, श्री. भिमराव टेले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोथरूड पोलीस ठाणे, श्री. हेमंत पाटील, पोलीस उप- निरीक्षक, बसवराज माळी, पोलीस अंमलदार, दिपक दाभेकर, राहूल बारड, पोपट खाडे यांनी केली आहे.












