पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १९ : केशवनगर भागामध्ये दहशत [ panic ] निर्माण करणाऱ्या आरोपींना जेरबंद केल्याची घटना उघडकीस आली आहे.मुंढवा पोलिस स्टेशनच्या [ mundhwa police station ] हद्दीत ही घटना घडली असून सोपान रामेश्वर सावंत ( वय २२, रा. सदाशिव नगर, फुरसुंगी ) व अभिषेक संजय जरांडे ( वय २०, रा.केशवनगर, मुंढवा ) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपी हे केशवनगर भागात मेडिकल स्टोअर [ medical store ] मध्ये जाऊन वस्तूंची खरेदी करत पैसे द्यायचे नाही. तसेच लोखंडी हत्याराचा धाक दाखवून , मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आरोपींकडून गुन्ह्यात [ crime ] वापरण्यात आलेले शस्त्र ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपींवर भादवी कलम ३२४ आर्म ॲक्ट ४, २५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कामगिरी, मा अपर पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर व मा. पोलीस उप-आयुक्त श्री. विक्रांत देशमुख, परिमंडळ-५ पुणे शहर मा. सहा पोलीस आयुक्त श्रीमती अश्विनी राख, हडपसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विष्णू ताम्हाणे यांचे सुधानाप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक समीर करपे, संदीप जोरे, पोलीस उपनिरीक्षक, धनंजय गाडे, पोलीस अंमलदार दिनेश राणे वैभव मोरे, सचिन बोराटे, दत्ता जाधव, स्वप्निल रासकर, सचिन पाटील यांनी यशस्वी कारवाई केलेली आहे.












