पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २४ : पुणे शहरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. ही घटना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
राहुल विलास चव्हाण ( रा. काळाखडक, वाकड ) असे आरोपीचे नाव असून त्याच्या व त्याच्या साथीदारांवर वाकड पोलीस स्टेशन, हिंजवडी पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण १६ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
आरोपीने आतापर्यंत खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी मागणे, दुखापत, गंभीर दुखापत, अपहरण, तडीपार आदेशाचा भंग करणे, चोरी करणे, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, खंडणीसाठी तोडफोड करून दहशत निर्माण करणे, बेकायदेशीरपणे हत्यार जवळ बाळगणे, तसेच बेकायदेशीर रित्या जमाव जमवून दुखापत करणे, तोडफोड करणे अशा अनेक प्रकारच्या कारवाया केल्या आहेत.
आरोपीवर आतापर्यंत भादवि कलम १४३,१४७,१४८,३२४,४२७,५०४,३९५,३२३,३४,३२६,५०६ ( १ ),३८७,२९४,५०६ ( २ ), महा.पो.का.क.१४२, आर्म ॲक्ट ४ ( २५ ),३०७,४६१,३८०,३७९,५११,३०८ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची चौकशी करून मा.पोलीस आयुक्त श्री.विनय कुमार चौबे यांनी एम. पी. डी. ए. कायद्या अंतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे दि.२१ पासून स्थानबद्धतेची कारवाई सुनावली आहे.
सदरची कामगीरीही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त, डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, श्रीमती,
गोरे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. बाबासाहेब कोपनर, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे- १) पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. गणेश जवादवाड, वाकड पोलीस स्टेशन,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, (पी.सी.बी. गुन्हे शाखा), पोलीस हवालदार, सचिन चव्हाण, कारभारी (पी.सी.बी. गुन्हे शाखा), स. पो.फौ. पाटोळे, वाकड पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड यांनी केली आहे.












