आजकाल दहशत निर्माण करण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही.अज्ञात इसमांनी काही कारण नसताना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.
याप्रकरणी फिर्यादीने तीन अज्ञात इसमांविरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.फिर्यादी हे महर्षीनगर येथील त्यांच्या राहत्या घरी मोपेडवरून जात असताना अचानक तीन इसम दुचाकीवरून आले अणि त्यांनी काही कारण नसताना स्वतःची दुचाकी फिर्यादीच्या दुचाकीसमोर आडवी लावली.तसेच फिर्यादी यांच्या डोळ्यांमध्ये मिरची पावडर फेकत,कोयत्याचा धाक दाखवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपींवर भादवी कलम ३४१,५०६ ( २ ),३४ आर्म ॲक्ट कलम – ४ ( २५ ) महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ ( १ ) १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले हे करत आहेत.












