पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ३० : दहशत माजवण्याच्या हेतूने आरोपी अनेकांचे नुकसान हे करत असतात. अशीच एक घटना हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
एका नागरिकाने तीन अनोळखी इसमां विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी यांचे रुक्मिणी कॉम्प्लेक्स, शेवाळवाडी फाटा, मांजरी बुद्रुक येथे चैतन्य स्वीट्स अँड स्नॅक्स सेंटर नावाचे दुकान आहे. फिर्यादी त्यांच्या दुकानात असताना तीन अनोळखी इसम त्यांच्या दुकानात आले. त्यांनी दुकानातील कॅश काऊंटर, मिठाईचे काउंटर, दुकानातील शोकेस, दुकानात बाहेर असलेले नाश्त्याचे काउंटर, धारदार शस्त्राने फोडले. काउंटर मधील रोख रक्कम दोन हजार रुपये हिसकावून घेतले. तसेच त्यांच्या हातातील धारदार शस्त्र हवेत फिरवत खबरदार कोणी मध्ये आला तर कोणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली.
आरोपींवर भादवि कलम ३९२, ४२७, ३४, ५०६, शस्त्र अधिनियम कलम ( ४ ),२५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) ( ३ ) १३५, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ३, ७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. सदर घटनेचा तपास पोलीस उप निरीक्षक नानासाहेब जाधव हे करीत आहेत.












