पुणे प्रतिनिधी
हडपसर परिसरात दहशत माजविणारी अट्टल गुन्हेगारावर एम.पी.डी.ए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. विनोद तुळजाराम बंदिछोडे (वय २६ रा. कामठेवस्ती, हडपसर) पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ४८ कारवाई आहे.
सदर आरोपी हा हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही साथीदारांसह लोखंडी कोयता, चाकू या सारख्या जीवघेण्या हत्यारासह खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दंगा करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे या सारख्या गंभीर गुन्ह्या मध्ये सहभागी आहे. सदर आरोपी विरोधात मागील पाच वर्षा मध्ये सहा गुन्हे दाखल आहेत. अशा गुन्हेगारी कृत्त्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती.
सदर आरोपी विरोधातील प्राप्त प्रस्ताव व कागद पात्राची पडताळणी करून पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एम.पी.डी.ए कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षाकरिता स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. ही कारवाई हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके व पी.सी.बी. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.टी खोबरे यांनी पार पडले आहे.












