पुणे प्रतिनिधी
पुणे दि.4 : कमला नेहरू चौकात दहशत माजविणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मकोका कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ४३ वी आहे. तैफीक रियाज भोलावाले (वय २२ रा. कसबा पेठ,टोळी प्रमुख), ऋतिक राजेश गायकवाड (वय २२ रा. मंगळवर पेठ),उजेर शाहिद शेख (वय २१ रा. मंगळवर पेठ),अरमान इकबर शेख (वय २० रा.मंगळवर पेठ), रफिक जाफर शेख (वय ३५ रा. मंगळवर पेठ) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या तपासा मध्ये टोळी प्रमुख नव्याने टोळी तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे. मागील सहा वर्षां पासून आरोपीवर व त्याच्या साथीदारांवर शस्र जवळ बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत,नागरिकांच्या मालमतेचे नुकसान करणे,दहशत निर्माण करणे,अशा गुन्ह्यात सहभागी आहे.सदर टोळी प्रमुखांवर एकूण नऊ गुन्हे दाखल आहे.
फिर्यादी हे रात्रीच्या वेळी कमला नेहरू चौकात मित्रांसोबत गप्पा मारत असताना सदर टोळीने पूर्व वैमनस्यातून झालेल्या भांडनाचा मनात राग घरून फिर्यादी यांच्यावर लोखंडी रॉड,हॉकी स्टीक व लाकडी बांबूने मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
सदर आरोपी विरोधात भा.द.वी.कलाम ३०७,३२४,१४३,१४४,१४७,१४८,१४९, ३२३, ५०६, मपो.अधि.कलाम ३७(१) १३५ आर्म अॅक्ट कलाम ४(२५) क्रिमिनल लॉ अमेंडमेन्ट अॅक्ट कलाम ७ अंतर्गत फरासखाना पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सह पोलीस आयुक्त फरासखाना विभाग अशोक धुमाळ करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहा आयुक्ता संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, पोलीस उप आयुक्त संदीप सिंह गिल्ल, सह पोलीस आयुक्त फरासखाना विभाग अशोक धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा फरासखाना पोलीस स्टेशन मंगेश जगताप, सर्व बॅलन्स पथकाकडील सह पोलीस निरीक्षक संतोष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस आमदार अजित शिंदे, तुषार खडके, पंकज देशमुख, शशिकांत ननावरे, पुंडलिक झुंबर यांनी केले आहे.
दहशत माजविणाऱ्या टोळीवर मकोका












