राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 29.86 टक्के लागला आहे. पुणे विभागाचा निकाल 22.22 टक्के लागला आहे. मात्र, यावेळी लातूर विभागाचा निकाल 51.47 टक्के लागला तर मुंबई विभाग 15.75 टक्के निकालासह शेवटच्या स्थानावर आहे.
महाराष्ट्र शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे दहावीचा निकाल आणि विभागनिहाय टक्केवारी जाहीर केली. यामध्ये अमरावती विभागाचा निकाल 43.37 टक्के, नागपूर 41.90 टक्के, नाशिक 41.90 टक्के, औरंगाबाद 37.25 टक्के, कोल्हापूर 29.18 टक्के लागला आहे.
दहावीच्या निकालात लातूर विभागाने बाजी मारली आहे. अमरावती, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई विभागांनी त्यापेक्षा कमी कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली होती. यंदा एसएससीच्या पुनर्परीक्षेसाठी ४९ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर ! पुणे विभागाची यंदाची कामगिरी २२.२२ टक्के












