पुणे प्रतिनिधी
पुणे दि.३ : गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड परिसरात वाहन चोरीच्या घटनां मध्ये वाढ झाल्याचे दिसून आले होते. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. दहा वेगवेगळ्या ठिकाणाहून वाहन चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे.
कमलेश भागवत परदेशी (वय २२ रा. चिंतामणी चौक,चिंचवड, मु.पो.ता. चाळीस गाव,जि. जळगाव), शुभम राजेंद्र निकम (वय २० रा. वाल्लेकरवाडी, चिंचवड), पुष्पक दिलीप पाटील (वय २३ रा. आनंदवन सोसायटी,थेरगाव), प्रज्वल लालजी भोसले (वय २४ रा. वाल्लेकरवाडी, चिंचवड) असे आरोपींचे नावे आहेत.
वाकड व चिखली परिसरातून चोरीस गेलेल्या होंडा शाईन व होंडा सीबी शाईन या मोटार सायकली त्यांच्या कडून जप्त करण्यात आले आहे. तसेच पिंपरी चिंचवड परिसरातून पाच लाख रुपये किंमतीचे दहा मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले आहे.
वाकड तपास पथकाने चालू आर्थिक वर्षात आता पर्यंत आरोपीं कडून ४५ लाख रुपये किंमतीचे ९० मोटार सायकल जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त काकासाहेब डोळे, सह पोलीस उपायुक्त परी-२ विशाल हिरे सह पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जवाद वाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सह पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, सह पोलीस बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, स्वप्निल खेतले, दीपक साबळे आतिश जाधव, प्रमोद कदम, प्रशांत गिलबिले, विक्रांत चव्हाण, राम तळपे, अजय पल्ले भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, सौदागर लामतुरे विनायक घारगे, रमेश खेडकर,सागर पंडित, यांनी मिळून केले आहे.
दहा मोटार सायकल चोरणाऱ्या चौघांना अटक












