पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०६ : शहरात ठीकठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्सहात साजरी केली जाते. या पाश्वभूमीवर वाहतूक पोलीसांकडून उद्या (दि.७) पुणे शहरात दहीहंडी उत्सवानिमित्त वाहतुकीत बदल बदल करण्यात आले आहे.
विषेतः शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजीनगर, लक्ष्मीरोड, बालाजीरोड, टिळकरोड वर सायंकाळी ५ वा. पासून ते दहीहंडी फुटे पर्यंत बुधवार पेठ ते दत्त मंदिर चौक तसेच बेलबाग चौक ते सेवासदन, बुधवार चौक ते आप्पा बळवंत चौक, मंडई चौक, नवी पेठ इत्यादी ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यावेळी रस्त्यांवर कोठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये व वाहन चालकांची गैरसोय होऊ नये. या साठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.
पुढील मार्गात बदल
१ . शिवाजीनगर रोड वरून स्वारगेटला जाण्यासाठी : स गो बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक पुढे शास्त्री रोडने नागरिक इच्छित स्थळी जाता येईल.
२ . पूरम चौकातून बाजीराव रोड वरून शिवाजीनगर कडे जाण्यासाठी : पूरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे जातील तसेच पुरम चौकातून सेनादत्त चौकाकडे इच्छित स्थळी जाता येईल.
३ . स गो बर्वे चौकातून पुणे मनपा भवनाकडे जाण्यासाठी : स गो बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छित स्थळी जाता येईल.
४ . बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक सोडण्यात आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारे वाहतूक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छित स्थळी जाता येईल.
५ . रामेश्वर चौक ते शनिवार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आले असून पर्यायी मार्गाचा वापर करावा.
शिवाजी रोड वरून जिजामाता चौकातून गणेश फोडणे दारूवाला पुलाकडे जाणारे : गाडगीळ पुतळा येथून डाव्या बाजूने कुंभार वेस चौक पवळे चौक जुनी साततोटी पोलीस चौकी मार्गे पुढे इच्छित स्थळी नागरिक जातील. सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रोडने सरळ सेवासदन कडे जाणारे वाहतूक, गणेश रोडवरील संपूर्ण वाहतूक तसेच देवजी बाबा चौक व फडके हाऊस चौक वाहतुकीस बंद करण्यात आले आहे. अपोलो टॉकीज, नरपत गिरी चौक, दारूवाला पूल, दूध भट्टी या मार्गाचा वापर वाहन चालकांनी करावा.
दहीहंडी उत्सवानिमित्त पुणे मध्यवर्ती भागात वाहतुकीत बदल












