पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २७ : दारू पिऊन तमाशा घालत तरुणीला जखमी करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ही घटना चिंचवड पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली असून पीडित महिलेने नाना जालिंदर गायकवाड ( वय ३०, रा.आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड ) व दादा पारस खवळे ( रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड ) यांच्या विरूद्ध तक्रार दाखल केली आहे.
दि. २४ रोजी फिर्यादी ह्या कामाला जात असताना आरोपींनी त्यांना अडवून तू आम्हाला आवडतेस, तू आमच्याशी बोलत नाहीस, निदान तुझा नंबर तरी दे असे म्हणाले. तसेच दि. २६ रोजी आरोपी यांनी दारू पिऊन फिर्यादी यांच्या घरी जाऊन तमाशा घालण्यास सुरुवात केली.नाना याने आम्ही दोघे तुझ्या घरी येऊन घराचा दरवाजा वाजवतो हे माझ्या बायकोला का सांगितले,ही गोष्ट आपल्या तिघांतच ठेवायची होती ना असे म्हणून तिचा डावा हात पिरगाळत त्याच्यावर ब्लेड ने मारून जखमी केले.दादा याने फिर्यादी यांच्या डाव्या हातास धरत त्यांच्या अंगावरील कुर्ती ओढून फाडली आणि त्यांचा विनयभंग केला आहे.
आरोपींवर भादवी कलम ३५४,२२४,३२३,३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आले नाही.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक चव्हाण हे करत आहेत.












