भोसरी मध्ये एक धक्का दायक घटना घडली आहे. पतीने दारू प्यायला पत्नीकडे पैसे मागितले, तिने पैसे देण्यास नकार दिल्याने पतीने रंगाच्या भारत केला पत्नीचा निर्घृण पणे खून. एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.
मारुती बाबना ,वय वर्ष ५० रा. सिल्वर करिष्मा बिल्डिंग समोर शिवाजी वाडी मोशी याठिकाणी दोघे राहत होते. पत्नी जयश्री मारुती बाबना, वय ४७ वर्ष हीच ती दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याचे कारणावरून लोखंडी रॉड डोक्यामध्ये मारून हत्या केली आहे. सदर घटनेनंतर आरोपी मारुती बाबना हा फरार झाला असून त्याचा शोध एमआयडीसी भोसरी पोलीस घेत आहे. याप्रकरणातील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पठारे करत आहे.