पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्शे कार अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विविध स्तरावून रोष उमटला. या अपघाताला घेऊन आतापर्यंत पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.
त्यामध्ये अल्पवयीन मुलगा, त्यांचे वडील विशाल अगरवाल, आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल आणि पब मालक सह मॅनेजर यांचा समावेश आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आपल्या कारवाईला वेग दिल्याचे दिसत आहे. अनेक अनधिकृत पब जमीनदोस्त करण्यात आले. आता पुण्यात जवळपास सगळ्याच मद्य विक्रीच्या दुकानावर पाटी लावत महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार दारू विक्रीचे नियम व अटी त्यामध्ये देण्यात आल्या आहेत.
यामध्ये २१ वर्षाखालील व्यक्तीला दारू दिली जाणार नसल्याचे म्हंटले आहे. तसेच २१ ते २५ वयोगातील व्यक्तींना सौम्य बिअर विकली जाणार आहे. तर २५ वर्षावरील व्यक्तीला सर्व प्रकारचे मद्य विकले जाणार आहे. त्यामध्ये व्हिस्की, रम, व्होडका बिअर यांचा समावेश असणार आहे.
याआधी बियर शॉप, वाईन शॉप वाले येईल त्याला दारू विकत होते मात्र अशा कारवाईनंतर जर मद्य घेण्यासाठी अल्पवयीन मुलगा दिसला तर तुला दारू मिळणार नाही सांगत माघारी पाठवत आहेत. दारूसाठी मोठ्या व्यक्तीला पाठवून देण्यासाठी सांगत आहेत. त्यामुळे तळीरामांना अडचण निर्माण होत आहे.