पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.१२ : सहकार नगर परिसरात रात्रीच्या वेळी २६ गाड्या फोडल्याची घटना समोर आली होती. ही घटना २० जून रोजी घडली होती. या प्रकरणी टोळी प्रमुखा सह नऊ जणांन विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची गुन्हेगारांन विरोधात ४६ वी मोक्का कारवाई केली आहे.
दिग्विजय ऊर्फ पपुल्या तुकाराम वाघमारे (टोळी प्रमुख,वय २० रा. रामनगर,वारजे), कमल चक्राबहादूर साह (वय १९ रा,चव्हाण नगर,धनकवडी),भगवान धाकलु खरात (वय २० रा. श्रमिक वसाहत,कर्वेनगर),लिगप्पा ऊर्फ नितीन सुरेश गडदे (वय २० रा. वडारवस्ती, कर्वेनगर),देविदास बसवराज (वय १९ रा. कॅनल रोड, कर्वेनगर) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. तसेच टोळीतील तीन आरोपी फरार असून दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस तपासात सदर टोळीवर एकूण १४ गुन्हे दाखल आहेत. सदर टोळी प्रमुख टोळी वाढवण्यासाठी बालकांचा वापर करीत होता. टोळी प्रमुखावर व त्याच्या इतर साथीदारांवर खुनाचा प्रयत्न,परिसरात दहशत पसरविणे,बालकांना दारूचे व्यसन लावणे व पैश्याचे अमिश दाखवून गुन्हा घडवून आणने अशा गुन्ह्यात सहभागी आहेत.
या प्रकरणी आरोपीं विरोधात भा.द.वी कलम १४३,१४४,१४७,१४८,१४९,४२७,५०६ (२) आर्म अॅक्ट ४(२५) म.पो.अधि.क ३७(१)(३) सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी
नियंत्रण कायदा कलाम ३(१)(ii),३(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सह पोलीस आयुक्त (स्वारगेट विभाग) नारायण शिरगावकर करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त परि-२ स्मार्ताना पाटील, सह पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक संदीप,सर्व्हेलन्स पथकाकडील अमलदार संजय गायकवाड, मंगेश खेडकर, पूजा तिकडे, भाऊसाहेब आहेर, यांनी केले आहे.












