पुणे : नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेची अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. 6) निवारा वृद्धाश्रम सभागृह, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धेचे यंदाचे 32वे वर्ष आहे.
नाट्यछटा स्पर्धेची प्राथमिक फेरी पुण्यातील चार केंद्रांवर झाली. सहा गटात झालेल्या स्पर्धेत एकूण 390 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातील 90 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरीला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार असून स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. पारितोषिक वितरण ज्येष्ठ नाट्य–चित्रपट अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते होणार असून ‘नवक्षितीज‘च्या विश्वस्त स्मिता शेट्टी, मित्र मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त स्वाती भावे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी निवेदनाद्वारे दिली.












