पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १२ : प्रवाशांना अखंड “लास्ट माईल कनेक्टिव्हिटी” देण्यासाठी, दिवाणी न्यायालय मेट्रो स्टेशनवर ऑटो-रिक्षा फीडर सेवा सुरू करण्यात आली आहे.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी समारंभापेक्षा कार्यक्षमतेला प्राधान्य देत ऑटो-रिक्षा सेवेचे उद्घाटन केले आहे. अशा सुविधेसाठी मेट्रो प्रवाशांनी व्यक्त केलेल्या मागणीमुळे ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांनी या सेवेचा उद्देश प्रवाशांच्या प्रवासाच्या पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यातील अंतर भरून काढणे आणि सोयीस्कर प्रवास सुनिश्चित करणे यावर भर दिला आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, नितीन पवार, रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस अतुल गाडगीळ (वर्क्स) आणि विनोदकुमार अग्रवाल (ऑपरेशन), पुणे मेट्रोचे संचालक, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे, प्रशासन आणि जनसंपर्क उप महाव्यवस्थापक मनोज कुमार डॅनियल, मेट्रो अधिकारी आणि ऑटो-रिक्षा चालक यांची उपस्थिती होती.












