बिबवेवाडी : दिवसेंदिवस जबरी चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. अशीच एक घटना बिबवेवाडी परिसरात घालायचे निदर्शनास आले आहे. हि घटना आज मंगळवारी रात्री १२ वाजतेच्या सुमारास यश लॉन्सच्या गेट समोर, बिबवेवाडी, पुणे येथे घडली आहे.
सदर चोरीची तक्रार एक महिलेने वय ७३ वर्षे, रा. सुखसागर नगर, काञज. दिली आहे. फिर्यादी महिला रात्री त्यांच्या कार मध्ये बसत असताना मोटार सायकलवरील चार अनोळखी इसमांनी पाठीमागुन त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले आहे.
बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांच्या विरोधात भादविक ३९२,३४ कलाम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहे.
दुचाकीवरून येवुन सोन्याचे मंगळसूत्र केले लंपास












