पुणे | प्रतिनिधी
पुणे : पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरी अजूनही पुढचा पाऊस नाही अनेक भागात खंड पडल्याने खरिपाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. बीड जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असून त्याचा परिणाम पोळा सणावर दिसून येत आहे. त्याचबरोबर राज्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव पसरत असल्याने अनेक ठिकाणी पोळ्यावर निर्बंध आहेत. लम्पीचा प्रादुर्भाव रोखावा यासाठी प्रशासनाने दक्षता घेण्याचे आव्हान केले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा बैलपोळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या साहित्य खरेदीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. पोळ्यानंतर परतीचा पाऊस येतो. मात्र परतीच्या पावसाची ही शाश्वती दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल होत आहेत.
बीड जिल्ह्यात अजूनही अनेक भागात पुरेचा पाऊस नाही. बैलपोळ्याला शेतकरी सजावटीचे साहित्य खरेदी करतात. शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर सारखी साधने जरी असली, तरीही गाई, म्हशी, शेळया, बकऱ्यांसारखे जनावरे आजही शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात आहेत. या प्राण्यांना का होईना शेतकरी गोंडे, शेंदूर, चवार, हिंगुळ असे साहित्य आपल्या जनावरांना घेऊन जातात. बैलांचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे मुथळे, घुंगरमाळा, पितळी तोडा, मोरखी, झालर, शेंब्या आदी वस्तुंना मागणी आता कमी झाले आहे व त्यानुसार विक्रीतेही कमी झाल्याचे व्यापारी सांगतात. दुष्काळ असो की नसो मुक्या प्राण्यांना त्याचं काहीही नसते पण आपल्या घरी असलेल्या बैल, गाई, म्हशी यांचा सण त्यांना सजवून त्यांना गोड खाऊ घालूनच साजरा करत असतो तरच मनाला प्रसन्न वाटते असे शेतकरी म्हणतात.












