देहुरोड- देहुरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत विकास नगर येथील नेटके कॉलनी जवळ आज (दि. ६ रोजी) मध्यरात्री तीन वाजता सुमारास एका २४ वर्षे युवकाचा खून झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल विजय थोरी वय सुमारे २४ वर्ष असे खून झालेले त्याला त्याच भागातील टाक चार ते पाच मुलांनी डोक्यामध्ये व तोंडावर, कुंडी, सिमेंटचे गट्टू व लाकडी बांबूने मारहाण करून जिवे मारले आहे.
सदर खुणाची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त देहूरोड विभाग व सह पोलीस आयुक्त परिमंडल २ यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे. चारही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी वय.सी.एम. रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.