बाप्पा हा सर्वांचा आवडता देवता आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सर्वांनाचा गणपती आवडतो. त्यामुळे गणेश चतुर्थी असो किंवा गणेश जयंती आपल्या देशात उत्साहात साजरी केली जाते.आज दैनिक राज्य लोकतंत्र मध्ये माघी गणेश जयंती निमित्त पूजा ठेवली होती.
या पूजेमध्ये अनेक पत्रकार उपस्थित होते. पूजे मध्ये यज्ञ करण्यात आला. पंडितजीनी पूजेचे महत्व सांगितले गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !
चौदा विद्या चौसष्ठ कलां’चा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव उद्या पासून सुरू होत आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ‘श्रीगणेशजयंती’ म्हणून ओळखली जाते. या पूजेला दैनिक राज्य लोकतंत्रचे, संपादक गणेश मोकाशी,सीमा मस्के, अनुष्का कोंड्रा, ऋषिकेश जगताप, राजेश नागरे, ऋषिकेश वजीरनाथ,पिंपरी चिंचवड व पुणे पत्रकार संघातील पत्रकार उपस्थित होते.