नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्य चिटणीस इर्शाद अली मदारी यांच्यावर रंग फेक करण्याची धक्कादायक घटना घडली आहे.ही घटना दिनांक 21 डिसेंबर रोजी देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल च्या समोर घडली.

इर्शाद मदारी हे त्यांच्या खाजगी चार चाकी वाहनामधून पुणे ते लोणावळा च्या दिशेने जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना हाताचा इशारा करून थांबवले, इर्शाद यांनी गाडी बाजूला घेत गाडीची काच खाली केली तेव्हा त्या इस्मानी त्यांना ‘तू इर्शाद मदारी आहे का?’ असे विचारले व त्यांनी हो असे सांगितले असता हातात असलेले डब्यामधील रंग त्यांचा अंगावर फेकले.

घडलेल्या घटने नंतर इर्शाद यांनी त्वरित देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये संबंधित प्रकाराबाबतची तक्रार दिली. देहूरोड पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तीं विरोधात भा. दं.वी. कलम ३२३, व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, हे व्यक्ती कोण होते?, ते इर्शाद यांचा पाठलाग पुण्यापासून करत होते का?, यामागे काही राजकीय हस्तक्षेप आहे का? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.












