पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ११ : पुणे-नागपूर विमानात एका धक्कादायक घटनेत, फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेने विनयभंगाची तक्रार केल्यानंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली. आरोपीचे नागपूर विमानतळावर आगमन होताच नागपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ही घटना घडली जेव्हा ४० वर्षीय महिला पुणे ते नागपूर दरम्यानच्या फ्लाइटमधून प्रवास करत होती. विमान नागपूर विमानतळावर उतरणार असताना फिरोज शेख नूर मोहम्मद (वय 32, रा. कोंढवा, पुणे) या आरोपीने पीडितेकडे पाहून अश्लील हावभाव केले आणि त्यानंतर तिचा विनयभंग केला.
महिलेने या प्रकरणाची तक्रार एअरलाइन्स कर्मचाऱ्यांकडे केली आणि नंतर तक्रार दाखल करण्यात आली.आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नागपुरातील सोनेगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (IPC) कलम 354, 354 (अ) आणि 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागपूरजवळील एका औद्योगिक कारखान्यात कामासाठी जात होता. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे…












