पुणे : पुणे जिल्ह्यात एक चिंताजनक बाब समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील १० ते १५ लाख तरुणांची अद्याप मतदार नोंदणी यादीत नाव नोंदवण्यात आले नाही.
याबद्दल पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख म्हणाले की, ही बाब अत्यंत गंभीर आहे कारण निवडणूक प्रक्रियेत तरुणांचा सहभाग नसणे आणि मतदान न करणे हे लोकशाहीला गंभीर धोका आहे. तरुणांचा सहभाग वाढवणे खरोखर गरजेचे आहे. यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी 100 टक्के पात्र तरुणांच्या मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा.
माहितीनुसार, निवडणूक प्रक्रियेत तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. तरुण मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून यामध्ये महाविद्यालयांचा चांगला सहभाग अपेक्षित आहे. १८ ते २९ वयोगटातील सुमारे १५ लाख तरुण मतदानापासून वंचीत आहे.
त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ज्या तरुण-तरुणींची नावे अद्याप मतदार यादीत नोंदली गेली नाहीत, त्यांनी पुढे येऊन आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
धक्कादायक! 15 लाख तरुण मतदानापासून वंचित












