पिंपरी: आज (दि. ७) रोजी दै. लोकमत च्या वतिने पिंपरी चिंचवड नगरपालिका व माजी महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षते खाली प्राधिकरण निगडी येथील ग.दी. माडगुळकर सभागृह्यामध्ये जनरल सभेचे आयोजन करण्यात आले होते, या सभेच्या अध्यक्ष स्थानी महानगरपालिकेच्या माजी माहापौर सौ. माई ढोरे, पिं.चि.म.न.पा. अतिरिक्त आयुक्त प्रदिप जाभंळे, नगररचना सचिव दिलीप गावडे, करसंकलन प्रमुख निलेश देशमुख दै. लोकमतचे संपादक, प्रतिनिधी व इतर माध्यमांचे प्रतिनिधी तसेच राजकीय क्षेत्रातील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे संस्थापक अध्येक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी अध्यक्षांसमोर पिंपरी-चिंचवड नगरपालिका प्रभाग क्र १६ येथील महात्वाचे प्रश्न मांडले.
तंतरपाळे यांनी मांडलेले मुद्दे खालील प्रमाणे आहेत:
१. प्रभाग क्र १६ किवळे, मामुर्डी, रावेत येथिल डि.पी.रस्ते व आरक्षणे अद्यापही ताब्यात नाही; ते लवकरात कवकर ताब्यात घ्यावेत.
२. प्रभागामंध्ये महिला, पुरुषा साठी सार्वजनिक शौचालय, मुता-या नाही.
३. जेष्ठ नागरीकासाठी सभागृह सभामांडप व विरुगुळा केन्द्र करावे.
४. वाय.सी.एम. रुग्णालय पिंपरी चिंचवड येथील आय.सी.यु. बेड वाढवावे.
५. गरज नसताना हि विकासनगर किवळे परिसरामंध्ये २००० यॉर्ड रेडझोन लावला आहे तो कमी करणे बाबत केन्द्र सरकारला शिफारस करावी.
६. एस.आर.ऐ. स्कीम मध्ये मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार चालु आहे, ते थांबवावे.